Video narration
आता एक महत्त्वाचा प्रश्न! Why is a Convex Lens called a Converging Lens? Convex Lens ला Converging Lens का म्हणतात? विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असलेले प्रकाशकिरण Convex Lens मधून जातात, तेव्हा अपवर्तनामुळे ते एका विशिष्ट बिंदूवर एकत्र येतात. या बिंदूला म्हणतात Principal Focus, मुख्य नाभी. आणि प्रकाशकिरण एकत्र येण्याच्या क्रियेला म्हणतात Convergence. म्हणून Convex Lens ला Converging Lens असे म्हणतात. चला, आता एकदा Definition पुन्हा म्हणूया. "A convex lens is a transparent optical lens which is thicker at the centre and thinner at the edges." आणि लक्षात ठेवा, Convex means Thicker at the Centre, Thinner at the Edges and Converging Light Rays! विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानामधील प्रत्येक Definition समजून घेतली, तर ती पाठ करण्याची गरजच पडणार नाही. कारण, "Don't Just Memorize Science, Understand Science!" मी प्रा. पी. एस. जाधव, Versatile Academy, Latur. धन्यवाद!