Video narration
परीक्षा जवळ आली आहे, अभ्यास अजून बाकी आहे, आणि “आता उशीर झाला” ही भावना तुम्हाला सुरुवात करू देत नाहीये. पण अजूनही आजपासून सुरुवात करता येते. तुमचे आई-वडील आणि शिक्षक तुमच्या यशासाठी मनापासून प्रयत्न करत आहेत; त्यांची साथ तुमच्यासोबत आहे. पण तुमच्या जागी अभ्यास ते करू शकत नाहीत. आता पुढची कृती तुमच्या हातात आहे. मोबाईलला तुमचा वेळ घेऊ देऊ नका. वेळ वाया घालवणं थांबवा आणि रोजच्या अभ्यासासाठी स्वतःला वेळ द्या. सगळं एकाच वेळी पूर्ण करायचं, असा ताण घेऊ नका; एकेक पाऊल टाका. दहावीचे गुण तुमचं संपूर्ण आयुष्य ठरवत नाहीत; पण आजची मेहनत तुमच्या उद्याच्या वाटेला दिशा देते. यशाकडे जाताना गुणांसोबत तुमचा आत्मविश्वासही महत्त्वाचा आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. उद्याची चिंता करत बसण्याऐवजी, हातातला आजचा वेळ अभ्यासाला द्या. सुरुवात छोटी असली, तरी ती तुमची असते. आता मोबाईल बाजूला ठेवा आणि एक धडा सुरू करा.